मांडवी अंगणवाडीत पोषण माहानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ कार्यक्रम उत्साहात संपन्न…

मांडवी, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी. दि. २९ सप्टेंबर २०२६:
एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प नागरी रत्नागिरी अंतर्गत मांडवी अंगणवाडी केंद्रात पोषण माहानिमित्त ‘आशीर्वादाचा दिवा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मांडवीचे नगरसेवक श्री. संतोषजी किर व नगरसेविका सौ. निवेदिता कळंबटे तसेच मुख्यसेविका सौ. कल्पना आंबवले मॅडम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मुख्यसेविका सौ. आंबवले मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून किशोरवयीन मुलींना स्वच्छतेविषयक तसेच किशोरवयात होणारे बदल यावर मार्गदर्शन केले. त्यानंतर मातृत्व वंदना व लेक लाडकी योजनेचा लाभ मिळालेल्या मुलींचे औक्षण करून ‘आशीर्वादाचा दिवा’ या कार्यक्रमातून लाभार्थी माता व बालिकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तसेच शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि त्याबाबत जनजागृती करणे याविषयी सौ. आंबवले मॅडम यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले.

या कार्यक्रमाला सर्व अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस वेदिका चव्हाण, गरोदर माता – स्तनदा माता, मुले, पालक, आशासेविका , ANM उपस्थित होत्या तसेच अंगणवाडी सेविका संध्या शिंदे यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button