रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आठ महिन्यात ११ लाचखोरांना पकडले


भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्राचा संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी रत्नागिरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाचखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. चालू वर्षात जानेवारीपासून अवघ्या अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत एकूण ८ प्रकरणांत एका खासगी मध्यस्थासह एकूण ११ जणांवर कारवाई केली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक ५ प्रकरणात ६ जण महसूल विभागाशी संबंधित आहेत शासकीय कामांसाठी सर्वसामान्य जनतेची अडवणूक करण्मया लाचखोरांना एसीबीने रंगेहात पकडले असून, विभागनिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहेः महसूल विभाग (५ प्रकरणे): ३ मंडळ अधिकारी, २ तलाठी आणि १ कोतवाल पोलीस प्रशासन (१ प्रकरण): १ पोलीस उपनिरीक्षक आणि १ खासगी व्यक्ती., सार्वजनिक पाटबंधारे विभाग (१ प्रकरण): १ कार्यकारी अभियंता आणि १ लिपिक, आरोग्य विभाग (१ प्रकरण): १ वैद्यकीय अधिकारी
कोणताही शासकीय अधिकारी वा कर्मचारी कायदेशीर कामासाठी विनाकारण अडवणूक करून लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी त्याला बळी न पडता थेट विरोध करावा. लाच मागणार्‍या इतकाच लाच देणाराही कायद्याने तितकाच दोषी ठरतो. त्यामुळे नागरिकांनी सजग व सुजाण नागरिकत्वाचे भान ठेवून भ्रष्टाचाराविरुद्ध ठामपणे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button