“शैक्षणिक संस्थाच विद्यार्थ्यांच्या मृत्यूला कारणीभूत”, IIT मुंबईमध्ये विद्यार्थ्याची आत्महत्या; नेहा बोरा, अभिजीत दिपकेंचा संताप!

IIT Bombay Student Suicide Case : ‘आयआयटी मुंबई’च्या एनर्जी सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्याने शुक्रवारी सायंकाळी आत्महत्या केली.

या घटनेनंतर आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी संस्थेच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत याप्रकरणी प्रशासनाला धारेवर धरलं. गेल्या वर्षभरातील ही तिसरी आत्महत्या आहे. त्यामुळे यावरून कॉक्रोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके आणि ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची अध्यक्षा नेहा बोरा यांनी संताप व्यक्त केला आहे.

आयआयटी मुंबईचं म्हणणं काय?

आयआयटी मुंबईने जारी केलेल्या निवेदनानुसार, संबंधित विद्यार्थी परीक्षेदरम्यान मोबाइलचा वापर करताना आढळला होता. त्याने प्रश्नपत्रिका चॅटजीपीटीवर अपलोड केली होती. मात्र या विद्यार्थ्याविरुद्ध कोणतीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली नाही. तसंच, संबंधित शिक्षक आणि विभागप्रमुखांनी त्या विद्यार्थ्याशी या विषयावर चर्चा केली. त्यांनी त्याचे समुपदेशन केले आणि या घटनेचा त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, अशी ग्वाही दिली. मात्र, थोड्यावेळाने त्याच्या खोलीमध्ये त्याचा मृतदेह आढळला.

विद्यार्थ्यांनी काय म्हटलं?

तर, विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेदरम्यान दुसऱ्या विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमध्ये पाहताना पकडण्यात आले. त्यामुळे या विद्यार्थ्याला परीक्षा कक्षातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर निलंबनासह शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते, अशी समजही त्याला देण्यात आल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलं. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांनी संस्थेच्या मुख्य प्रवेशद्वारावर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. प्रशासनाकडून घटनेबाबत उत्तरे देण्याची आणि न्यायाची मागणी केली. संस्थेच्या संचालकांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

अभिजीत दिपकेंची टीका

दरम्यान, याप्रकरणी अभिजीत दिपके म्हणाले, ‘दुर्गम आदिवासी भागांतही विद्यार्थी मरत आहेत आणि मुंबईसारख्या महानगरातही मरत आहेत. हे संकट कोणत्याही एका भौगोलिक क्षेत्रापुरतं मर्यादित नाही. विद्यार्थ्यांचं आयुष्य ही आमची प्राथमिकता बनण्यासाठी अजून किती विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागेल?’

Students are dying in remote Tribal areas, and they’re dying in a cosmopolitan city like Mumbai too. This crisis cuts across geography.

How many more students have to die before their lives become a priority? https://t.co/mNIsecU0ZC

— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) September 19, 2026

नेहा बोरा संतापली

‘…खूप लोक मरण पावले आहेत हे समजण्यासाठी अजून किती मृत्यू व्हावे लागतील… ज्या संस्थांमध्ये तुम्ही तुमच्या मुलांना इतक्या आशेने पाठवता, त्या संस्थाच त्यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. आयआयटी मुंबईमध्ये एका वर्षात झालेला हा तिसरा मृत्यू!’ असा संताप ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशनची अध्यक्षा नेहा बोरा हिने व्यक्त केला.

…how many deaths will it take till we know, that too many people have died…

The institutions that you send your children to with so much hope are causing their death.

3rd death in a year at IIT Bombay! pic.twitter.com/Qy0APPFV0q

— Neha (@neha_aisa) September 19, 2026

परीक्षा पुढे ढकलली?

विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समजताच आयआयटी मुंबईच्या मुख्य इमारतीजवळ ४०० हून अधिक विद्यार्थी गोळा झाले आणि त्यांनी प्रशासनाविरोधात घोषणाबाजी सुरू केली. आयआयटी-मुंबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे रात्री १०.३० च्या सुमारास विद्यार्थ्यांना भेटायला येईपर्यंत हे आंदोलन सुरू होतं. या बैठकीनंतर, विद्यार्थ्यांचा हा जमाव मुख्य इमारतीच्या समोर असलेल्या दीक्षांत समारंभ सभागृहात (कॉन्व्होकेशन हॉल) हलवण्यात आला. आंदोलनात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांच्या म्हणण्यानुसार, या घटनेच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेली मिड-सेमिस्टर (सत्रांतर्गत) परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button