रत्नागिरीतील प्रसिद्ध मूर्तिकार विनायक उर्फ विनू पाथरे यांचे दुःखद निधन


रेखीव आणि वैशिष्ट्यपूर्ण गणेशमूर्ती घडवणारा कुशल कलाकार हरपला;


रत्नागिरी : शहरातील प्रसिद्ध मूर्तिकार विनायक उर्फ विनू भालचंद्र पाथरे (वय ५३) यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रत्नागिरीतील कला आणि धार्मिक क्षेत्रात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

गोखले नाका परिसरात वास्तव्यास असलेल्या पाथरे कुटुंबाने मूर्तिकलेचा समृद्ध वारसा जपला आहे. गोखले नाका येथे विनायक पाथरे यांचा स्वतःचा गणपती मूर्ती बनवण्याचा कारखाना होता. त्यांनी साकारलेल्या गणेशमूर्तींना भाविकांची नेहमीच विशेष पसंती मिळत असे.

रेखीवपणा, आकर्षकता आणि वेगळेपण ही त्यांच्या मूर्तींची प्रमुख वैशिष्ट्ये होती. आपल्या कुशल कलाकृतींमधून त्यांनी गणेशभक्तांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते.

विनायक पाथरे यांचा रत्नागिरीतील राधाकृष्ण मंदिराच्या विविध धार्मिक कार्यातही मोठा आणि सक्रिय सहभाग होता. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, गणेशमूर्ती कलाकार तसेच भाविकवर्गातून तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button