
गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न येवू नये म्हणून कशेडी बोगद्यातील गळती रोखण्यासाठी आटापिटा
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपलेला असतानाच मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यात सुरू झालेल्या गळतीमुळे गणेशभक्तांच्या मार्गात विघ्न उभे ठाकले आहे. या बोगद्यातील गळती रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभाग अखेर खडबडून जागे झाले आहे.
कशेडी बोगद्यातील चारही मार्गिकतून वाहनचालकांचा प्रवास सुसाट झाल्याने वेळेची बचत होत आहे. मात्र गणेशोत्सवाच्या तोंडावरच बोगद्यात गळती सुरू झाल्याने राष्ट्रीय महामार्गाची डोकेदुखी वाढली आहे. गळती थोपवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने नानाविध क्लृप्त्यांचा अवलंब करूनही सार्या उपाययोजनांवर पाणी फेरले. यानंतर मुंबई आयआयटीच्या सल्ल्यानुसार गळती थोपवण्यासाठी उपाययोजनांचा अवलंबही करण्यात आला, या उपाययोजनाही निष्फळ ठरल्या आहेत.




