गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) महाविद्यालयाच्या विद्यार्थिनिंच्या संघाने मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालय आणि कोंकण विभागात इतिहासातील दूसरे रौप्य पदक पटकावले

 दि. ३१ ऑगस्ट ते  २ सप्टेंबर २०२६  रोजी  मुंबई विद्यापीठ मुंबई आणि एस. एम. शेट्टी आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि मॅनेजमेंट स्टडीज महाविद्यालय (स्वायत्त), पवई , मुंबई  यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई विद्यापीठ पुरुष व महिला  बॅडमिंटन आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन कालिदास क्रीडा संकुल, मुलुंड येथे करण्यात आले होते.
    सदर स्पर्धेत गोगटे जोगळेकर महाविद्यालय (स्वायत्त) रत्नागिरीच्या कु. श्रुति फणसे (एम.ए.भाग-१); कु. चार्वी कापडी (एस.वाय.बी.कॉम.); बॅ .बी. के.वेंगुर्ले महाविद्यालयाची कु. सबा शेख तर  एस. आर. एम. कुडाळ महाविद्यालयाच्या कु. श्रेया सामंत, कु. मैथिली ठाकूर या विद्यार्थिनींची मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धा-२०२६ करिता कोंकण विभाग नं. ४; महिला बॅडमिंटन संघामध्ये निवड झाली होती. कोंकण विभागाचे  प्रतिनिधित्व करताना आणि कर्णधार पदाची जबाबदारी  सांभाळीत कु. श्रुति फणसे हिने उत्कृष्ट खेळ करीत संघाला आणि कोंकण विभाग व महाविद्यालयासाठी सलग दुसऱ्या वर्षी मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला बॅडमिंटन स्पर्धेतील दुसरे रौप्य पदक पटकावले आणि स्पर्धेचे सांघिक उपविजेतेपद प्राप्त केले. महाविद्यालयाच्या तसेच कोंकण विभाग महिला बॅडमिंटन संघाला महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ. विनोद शिंदे, श्री.अब्दुलसमद शेख यांचे मार्गदर्शन लाभले व  श्री. माधव फणसे, क्रीडा शिक्षक प्रा कल्पेश बोटके यांचे सहकार्य लाभले.
   मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी रौप्य पदक व उपविजेतेपद  प्राप्त करणाऱ्या महिला बॅडमिंटन संघाला र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पताई पटवर्धन. कार्यवाह श्री. सतीशजी शेवडे. जिमखाना समितीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य  तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकिय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, तीनही शाखांचे उपप्राचार्य, डॉ. विवेक भिडे, सर्व प्राध्यापक सहकारी आणि कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेच्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button