मडगाव-नागपूर साप्ताहिक विशेष रेल्वेच्या फेऱ्या रद्द


प्रवाशांचा अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळत नसल्याने मडगाव जंक्शन-नागपूर-मडगाव जंक्शन या साप्ताहिक विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.याबाबतची माहिती कोकण रेल्वेने २८ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.

ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव जंक्शन-नागपूर साप्ताहिक विशेषची १५ सप्टेंबर २०२६ (मंगळवार) रोजी सुरू होणारी फेरी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.तसेच ट्रेन क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव जंक्शन साप्ताहिक विशेषची १६ सप्टेंबर २०२६ (बुधवार) रोजी सुरू होणारी फेरीही पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

या दोन्ही फेऱ्यांना प्रवाशांचा कमी प्रतिसाद (Poor Occupancy) मिळत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कोकण रेल्वेने स्पष्ट केले आहे. संबंधित प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button