पूर्वी बुकिंग केलेल्या वैयक्तिक तिकिटाला वाढीव दर आकारू नये : पराग कांबळे

गुहागर : राज्य शासनाने एसटी महामंडळाची दर वाढ लागू करण्यापूर्वीच्या ग्रुप बुकिंगवरील भाडे वाढ प्रवाशी जनतेच्या मागणीचा आदर करीत मागे घेतली आहे, या बद्दल सरकारचे खास आभार आहेच; मात्र याच निर्णयासोबत पूर्वी जी वैयक्तिक बुकिंग केलेली आहेत त्यांचे वाढीव भाडे पण रद्द करावे, अशी मागणी प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी केली आहे.
ज्यांनी दरवाढ लागू होण्या अगोदर बुकिंग केली आहेत, अशा प्रवाशी नागरिकांना गाडीत बसल्यावर वाढीव तिकीट आकारू नये, अशी मागणी करतानाच राज्याचे परिवहन मंत्री, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री या बाबत नक्कीच विचार करतील, असा आशावाद प्रवाशी संघटना व्यक्त करीत आहे.
कोकणातील जनतेने गणेशोत्सवासाठी तब्ब्ल तीनमहिने अगोदर बुकिंग केले होते; मात्र नंतर भाडे वाढ लागू झाली. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना आता गाडीत जादा आकार द्यावा लागेल तो आकारू नये, अशी मागणी प्रवाशी संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे, अशी माहिती प्रवाशी संघटनेचे गुहागर तालुका अध्यक्ष पराग कांबळे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button