मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथे भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात तरुणीचा मृत्यू


मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली येथील रंगीला ढाब्यासमोर भरधाव मोटारीवरील चालकाचा ताबा सुटल्याने मोटार दुभाजकावर आदळून पलटी झाली. या अपघातात चौघेजण जखमी झाले. ही घटना बुधवारी सायंकाळी ७.३० वा.च्या सुमारास झाली. या अपघातात कारमधून सुमारे २० फूट उंच हवेत फेकल्या गेलेल्या रणीता अविनाश नडगे (३६, रा. शिसदा फातरफाडा, दादरा व नगर हवेली) यांचा बांबोळी (गोवा) येथील रुग्णालयात उपचारादरम्यान बुधवारी रात्री मृत्यू झाला. तर फ्रान्सिस परेरा (४८, रा. म्हापसा), रसेल डिसोझा (४९, रा. मडगाव), आन्सल डिसोझा (६०) हे तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button