रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी गयाळवाडी येथील रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला


रत्नागिरी शहरालगतच्या खेडशी गयाळवाडी येथील रहिवासी इमारतीच्या पार्किंगमधून दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना शनिवारी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली. हनुमंत देवाप्पा पाटील (३४, रा. कारवांचीवाडी रत्नागिरी) यांनी याप्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हनुमंत यांनी १५ ऑगस्ट रोजी आपली दुचाकी (एमएच ०८ एआर ०९३०) गयाळवाडी येथे पार्किंगमध्ये उभी करुन ठेवली होती. दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास ही दुचाकी अज्ञाताने चोरुन नेली, अशी नोंद शहर पोलिसांत करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button