संजू परब हे जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी-उदयजी सामंत

सावंतवाडी येथील गोविंद चित्रमंदिर येथे आयोजित शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. सच्चिदानंद तथा संजू परब यांच्या जन्मदिनानिमित्त अभीष्टचिंतन सोहळ्यास शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी उपस्थित राहून त्यांना भावी आयुष्यासाठी आणि जनसेवेसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी संजू परब हे केवळ पदासाठी काम करणारे पदाधिकारी नाहीत, तर जमिनीवर उतरून लोकांचे प्रश्न सोडवणारे लोकप्रतिनिधी आहेत. सावंतवाडीच्या विकासासाठी, सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने अहोरात्र प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. या सोहळ्याला लाभलेली अलोट उपस्थिती हेच दाखवून देते की संजू परब यांनी कामाच्या जोरावर केवळ सहकाऱ्यांचेच नाही तर सर्वसामान्य जनतेचेही मन जिंकले आहे, असे म्हटले.

या सोहळ्याला आमदार श्री. दीपकजी केसरकर, आमदार श्री. निलेशजी राणे, माजी आमदार श्री. राजनजी तेली, श्री. दत्ता सामंत, जिल्हा बँक अध्यक्ष श्री. मनिष दळवी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल, जिल्हाप्रमुख नीताताई सावंत-कविटकर, श्री. संजय पडते, शिक्षण सभापती श्री. प्रितेश राऊळ, श्री. सचिन वालावलकर यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button