आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या; परवानाधारक बंदुकीतून झाडली गोळी


रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे-घारपूरेवाडी येथे मंगळवारी सकाळी धक्कादायक घटना घडली. दीर्घकाळापासून आजारपणाचा त्रास सहन करणाऱ्या ६४ वर्षीय वृद्धाने आपल्या परवानाधारक बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

माधव विष्णू आठवले (वय ६४, रा. घारपूरेवाडी, कोतवडे) असे मृत वृद्धाचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून ते दम्याच्या आजाराने त्रस्त होते. आजारपणामुळे होणाऱ्या शारीरिक त्रासातून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

मंगळवारी सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घराच्या मागील बाजूस असलेल्या पडवीत ही घटना घडली. गोळीबाराचा आवाज ऐकून त्यांचे पुतणे प्रसाद पांडुरंग आठवले (वय ४२) यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी माधव आठवले हे गंभीर अवस्थेत आढळून आले.

घटनेची माहिती मिळताच रत्नागिरी ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला.

या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील नेमके कारण तसेच घटनेशी संबंधित इतर बाबींचा पोलीस तपास सुरू आहे. या घटनेने कोतवडे-घारपूरेवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button