मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथे महामार्गावरील क्रॉसिंग बंद, अपघाताची भीती


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील गोळवली येथे चौपदरीकरणाच्या कामामुळे मावळंगे, कुंभारखाणी तसेच खाडीपट्ट्यातून महामार्गावर येणार्‍या वाहनांसाठी असलेले क्रॉसिंग काही दिवसांपूर्वी ठेकेदार कंपनीकडून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, चुकीच्या दिशेने वाहन चालवावे लागत असल्याने अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
मावळंगे, कुंभारखाणी आणि खाडीपट्ट्यातील अनेक गावांमधून येणारी वाहने गोळवली येथे महामार्गाला जोडली जातात. चौपदरीकरणाचे काम सुरू असताना
याच ठिकाणी वाहनांना महामार्ग ओलांडण्यासाठी क्रॉसिंग सुविधा उपलब्ध होती. मात्र, हे क्रॉसिंग बंद केल्याने स्थानिक वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button