
मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंत्र्याचा निर्णय फिरवण्याचा अधिकार, राज्य सरकारकडून नियमात महत्त्वाचा बदल
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आता सार्वजनिक हिताच्यादृष्टीने कोणत्याही मंत्र्याचा निर्णय बदलण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे.राज्य सरकारकडून ‘महाराष्ट्र शासन कार्यपद्धती नियम, 2026’ अधिसूचित करण्यात आली आहे. यामुळे प्रशासकीय पातळीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयावर हस्तक्षेप करता येणार आहे. या अधिसूचनेनुसार, सार्वजनिक हिताच्या बाबतीत मुख्यमंत्री कोणत्याही मंत्र्याने घेतलेला निर्णय बदलू शकतात. त्यामुळे आता आगामी काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती सरकारमधील एखाद्या मंत्र्याचा निर्णय फिरवल्यास त्याचे काय पडसाद उमटणार, हे पाहणे औत्स्युकाचे ठरेल




