उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत जिल्हा दौऱ्यावर


रत्नागिरी, दि. ६ ): राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत हे उद्या बुधवार, दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.
पालकमंत्री डॉ. सामंत यांच्या दौऱ्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
बुधवारी सकाळी ९ वाजता लोकमान्य टिळक नगर परिषद शाळा क्र. २ येथे केंद्रीय विद्यालय, नाचणेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता १ ते ५ मधील विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव समारंभ होणार आहे. याच कार्यक्रमात वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत रत्नागिरी नगर परिषद शाळा क्र. २ (लोकमान्य टिळक विद्यालय) च्या पुनर्बांधणी विकासकामाचा शुभारंभ डॉ. सामंत यांच्या उपस्थितीत पार पडेल.
त्यानंतर सकाळी १०.५० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल विभागातील अधिकाऱ्यांकरिता शासकीय वाहनांच्या हस्तांतरण सोहळ्यास ते उपस्थित राहतील. सकाळी ११ वाजता मराठी भाषा विकास कक्ष स्थापन करण्याच्या अनुषंगाने दूरदृश्य प्रणालीद्वारे (व्हिडिओ कॉन्फरन्सिंग) आयोजित आढावा बैठकीस ते उपस्थित राहून मार्गदर्शन करतील.
दुपारी १२ वाजता कै. लोकनेते शामरावजी पेजे सभागृह, रत्नागिरी येथे पंचायत समिती रत्नागिरी अंतर्गत आयोजित टंचाई निवारणार्थ टंचाई कृती आराखडा २०२६-२०२७ च्या आढावा सभेस पालकमंत्री उपस्थित राहणार आहेत.
दुपारी १.३० वाजता डॉ. सामंत रत्नागिरी विमानतळावरून विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button