दापोलीत प्लास्टिक कॅरीबॅगविरोधात नगरपंचायतीची धडक कारवाई; १० हजारांचा दंड वसूल


प्लास्टिकमुक्त दापोलीच्या दिशेने पाऊल टाकत दापोली नगरपंचायतीने शहरात प्लास्टिक कॅरीबॅगविरोधात धडक मोहीम राबवली. शहरातील विविध दुकाने व आस्थापनांची तपासणी करून सुमारे १५ ते २० किलो प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करण्यात आल्या. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांकडून एकूण १० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेता नागरिकांनी तसेच व्यापाऱ्यांनी प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर टाळून पर्यावरणपूरक पर्यायांचा अवलंब करावा, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.

यापुढे प्लास्टिक कॅरीबॅगची विक्री किंवा वापर करताना कोणी आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नियमांचे पालन करावे आणि नागरिकांनी प्लास्टिकमुक्त दापोलीच्या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले.

या मोहिमेत नगरपंचायतीचे कर्मचारी रिलेश गुरव, शितल शेठ, अरुण मोहिते, सुनील टांक, शशिकांत रहाटे, संदीप डिंगणकर, मंगेश जाधव, वैभव कुमटेकर, अनिकेत सिंनगारे आणि सुधीर जाधव यांनी सक्रिय सहभाग घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button