जिंदाल कंपनी प्रशासनाविरोधात स्थानिक शेतकरी व मच्छिमारांचे एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण

रत्नागिरी : जिंदाल कंपनी प्रशासनाकडून स्थानिक रहिवासी, शेतकरी आणि मच्छिमारांवर सतत होत असलेल्या अन्यायाविरोधात आज (१५ ऑगस्ट) स्थानिक नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली. कंपनी प्रशासनाचा जाहीर निषेध नोंदवण्यासाठी आणि बाधितांना न्याय मिळवून देण्यासाठी कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर एका दिवसाचे लाक्षणिक उपोषण छेडण्यात आले.
विकास कमलाकर निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुकद्दर नंदकुमार खाडे, दीपक चंद्रकांत परकर, निकेश कमलाकांत घाटगे या सहकाऱ्यांच्या पुढाकाराने हे उपोषण पार पडले. सकाळी ९ वाजल्यापासूनच उपोषणकर्त्यांनी जिंदाल कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ शांततापूर्ण मार्गाने ठिय्या मांडला होता. सायंकाळी ५ वाजेपर्यंत हे लाक्षणिक उपोषण सुरू राहणार आहे. स्थानिक जनता, शेतकरी आणि मच्छिमारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे कंपनी प्रशासनाचे लक्ष वेधणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश होता.
स्थानिक भूमीपुत्रांच्या या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी परिसरातील अनेक प्रमुख नागरिक व मान्यवर उपोषण स्थळी उपस्थित राहिले. त्यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला.

या उपोषणकर्त्यांना प्रमोद प्रभाकर घाटगे, अनिरुद्ध कमलाकर साळवी, सौ. अक्षदा अविनाश देवरुखकर, अविनाश अरुण देवरुखकर, सचिन पांडुरंग भोपळे, योगेश कृष्णा निंबाळकर आणि नितीन पांडुरंग भोपळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी या पाठिंबा दिला आहे.
कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभारामुळे स्थानिक शेतकरी व मच्छिमार बांधवांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. जर जिंदाल कंपनी प्रशासनाने स्थानिक जनता, शेतकरी आणि मच्छिमारांच्या समस्यांकडे त्वरित लक्ष देऊन न्याय दिला नाही, तर येत्या काळात यापेक्षाही अधिक तीव्र स्वरूपाचे जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा उपोषणकर्त्यांनी व ग्रामस्थांनी दिला आहे.
दरम्यान, यावेळी शिवस्वराज्य शेतकरी संघ. गुहागर यांचे पदाधिकारी आनंद भोजने, मंदार मुकुंद रहाटे, सौ. स्वाती हडकर, समीर सुर्वे, उमेश सुर्वे, जनाबभाई कारभारी, निखिल गडदे, शरद सुर्वे, पराग सुर्वे, स्वप्नील सुर्वे, सुजय पवार, मंगेश गडदे, प्रकाश गडदे, रत्नागिरी जिल्हा परिषद माजी सदस्य बाबूशेठ पाटील, शिवसेना विभागप्रमुख बाबयशेठ कल्याणकर, युवा नेते प्रथमेश गावणकर, फारुक संसारे, सौ. समीरा संसारे आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button