महिलेला धमकावणार्‍याची ती बंदूक खेळण्यातली निघाली


रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे मंगळवारी महिलेला बंदुकीने समोर धमकावण्याचा प्रकार आला होता. संबंधित व्यक्तीकडून धमकावण्यासाठी वापरण्यात आलेली बंदूक पोलीस तपासणीत हवेच्या दाबावर चालणारी टॉय आर्म (खेळण्यातील बंदूक) असल्याचे निष्पन्न झाले.
शहरातील मारुती मंदिर परिसरात १९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास नॅशनल मेडिकल शेजारील कस्तुरी चायनीज सेंटर येथे साजिदा समीर काझी, (४०, रा. कोहिनूर प्लाझा, मारुती मंदिर, रत्नागिरी) या त्यांच्या चायनीज सेंटरमध्ये होत्या. यावेळी त्यांचे नातेवाईक नसीरा हरीस शेख, हरीस आदम शेख आणि संजय वासुदेव पुनतळेकर, (सर्व रा. ओसवाल नगर, रत्नागिरी) हे तेथे आले. यावेळी संबंधितांमध्ये आपसात वाद झाला. त्यावेळी साजिदा यांना तक्रारदारास शिवीगाळ करून वस्तूच्या सहाय्याने वस्तूच्य आले, या. घटनेची बंदुकीसदृश धमकावण्यात आले. या घटनेची माहिती रत्नागिरी शहर पोलिसांना देण्यात आली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन रत्नागिरी शहर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी बंदुकीसदृश वस्तू आढळल्यानंतर पोलिसांनी तिची तपासणी केली. तसेच तज्ज्ञांकडून आलेल्या तपासणीत ती टॉय आर्म असून हवेच्या दाबावर चालणारी खेळण्यातील बंदूक असल्याचे स्पष्ट झाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button