
महावितरण चा अधिक्षक अभियंता यांना बहुजन समाज पार्टी चे निवेदन.
रत्नागिरी जिल्ह्यातील गंजलेले विद्युत खांब यांचा सर्व्हे करुन आपल्या यंत्रणेला आँडीट करुन विद्युत खांब बदलण्याबाबत कार्यवाही करावी, वीज पुरवठा बंद असताना सुद्धा वीज बीलात दफावत जाणवण नाही,अशाप्रकारचे निवेदन रत्नागिरी विद्युत महावितरण चे अधिक्षक अभियंता यांना बहुजन समाज पार्टी च्या वतीने देण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यातील तीनही कार्यकारी अभियंता यांना सुचित करुन दखल घेण्यात येईल असे अधिक्षक अभियंता यांनी सांगितले.
यावेळी रत्नागिरी विधानसभा प्रभारी किशोर पवार, रत्नागिरी विधानसभा अध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा उपाध्यक्ष अनंत पवार,अँड.प्रविण कांबळे, रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा प्रभारी अनिकेत पवार उपस्थित होते.



