आदिवासी भवनासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही : श्रेया कदम

खेड : आदिवासी समाजासाठी स्वतंत्र भवन उभारण्याच्या मागणीला आता आश्वासनाची जोड मिळाली असून, आदिवासी भवनाच्या उभारणीसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, अशी ग्वाही श्रेया कदम यांनी दिली.
कुणबी समाजाच्या भवनासाठी योगेश कदम यांनी स्वतःची खासगी जागा उपलब्ध करून देत प्रश्न मार्गी लावला आहे. त्याच धर्तीवर आदिवासी समाजालाही हक्काचे भवन मिळावे, अशी भूमिका श्रेया कदम यांनी मांडली.
शासनाच्या जीआरनुसार आदिवासी भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्यानंतर भवनाच्या बांधकामासाठी एक कोटी रुपयांपर्यंत निधी देण्याची तरतूद असल्याची माहिती त्यांनी दिली. या संदर्भात शासनासोबत चर्चा सुरू असून, भवन उभारणीसाठी आवश्यक असलेल्या बाबींचा पाठपुरावा केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना श्रेया कदम यांनी कुणबी भवनाच्या कामाचाही उल्लेख केला. योगेश कदम यांनी खासगी जागा उपलब्ध करून दिल्याने कुणबी समाजाच्या भवनाचे काम सुरू झाले असून, त्याचप्रमाणे आदिवासी समाजालाही स्वतंत्र भवन मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदिवासी भवनाच्या उभारणीसाठी शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या निधीव्यतिरिक्तही निधीची आवश्यकता भासल्यास रामदास कदम आणि योगेश कदम यांच्या माध्यमातून त्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असेही श्रेया कदम यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button