रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दुचाकी अपघातात तरुण जखमी


रत्नागिरी तालुक्यातील गोळप येथे दुचाकी अपघातात तरुण जखमी झाला. ही घटना बुधवारी सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घडली. कल्पेश दीपक घाणेकर (२२, रा. गोळप शिरबांडवाडी रत्नागिरी) असे जखमीचे नाव आहे. कल्पेश हा बुधवारी सायंकाळी आपल्या ताब्यातील दुचाकी घेऊन गोळप शिरबांडवाडी रस्त्याने जात होता. दुचाकीवरील ताबा सुटल्याने तो रस्त्याकडेच्या कातळावर आदळला. यामध्ये त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली असून उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button