
खेड शहरातील जगबुडी नदीजवळ १५,९७२ रुपये किंमतीच्या सुकलेल्या गांजासह १ लाख ९७२ रुपये किंमतीचा ऐवज जप्त
खेड शहराजवळील भोस्ते जगबुडी नदीवरील पूल ते देवणा पूल येथे जाणार्या जगबुडी नदीच्या काठावर १५,९७२ : ९९ रुपये किंमतीच्या १०७२ ग्रॅम वजनाच्या सुकलेल्या गांजासह एकूण १,००,९७२ : ९९ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. खेड पालिसांनी ही कारवाई ३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १ वाजता केली. खेड पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई साहेल इकबाल ढगे यांनी फिर्याद दाखल केल्यानुसार इरफान इद्रिस खान (१९, मुस्लिम मोहल्ला, आंबेड खुर्द, ता. संगमेश्वर) व मोहम्मद साद साजिद शहा (१८ वर्ष ११ महिने, दखनी मोहल्ला, कसबा, ता. संगमेश्वर) या दोघा संशयितांवर ३ ऑगस्ट २०२६ रोजी सायकाळी ५ ५९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोघा संशयितांकडन सुकलेल्या गांजासह १५ हजार व २० हजार रुपये किंमतीचे दोन स्मार्ट फोन आणि ५० हजार रुपये किंमतीची ज्युपिटर कंपनीची दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.




