
मत्स्य खात्याच्या इतिहासातील सर्वाधिक काम मंत्री नितेश राणेंनी केले.
महसूल मंत्री चंद्रशेखर चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले तोंडभरून कौतुक
मच्छीमारांना शेतकऱ्याचा दर्जा मिळवून देणे हा ऐतिहासिक निर्णय;
- नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
कणकवली;
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कणकवली येथील महसूल विभागाच्या समाधान कार्यक्रमात सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे तोंड भरून कौतुक केले. महाराष्ट्र राज्य मत्स्य व बंदरे मंत्रालयात आजपर्यंत कोणीही काम केलेले नाही त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त काम मंत्र नितेश राणे यांनी केले. मत्स्य उत्पादक घटक आला विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम करताना राज्यातील मच्छीमार बांधवांना शेतकऱ्याचा दर्जा दिला हे काम आज पर्यंतच्या मत्स्य मंत्रालयाच्या इतिहासात कोणीच करू शकलेला नाही असे ऐतिहासिक मंत्री नितेश राणे यांनी केलेले आहेत.
, या निर्णयामुळे मच्छीमार बांधवांना केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. नितेश राणे मंत्री असताना मत्स्य व्यवसायाचा एकही प्रश्न महाराष्ट्रात शिल्लक राहणार नाही, असा मला विश्वास व्यक्त करणारे गौरवोद्गार महसूल मंत्री बावनकुळे यांनी काढले.




