राजापूर नगरपरिषदेच्या कॉंग्रेसच्या नगरसेविका अफरोज झारी यांचे नगरसेवक पद धोक्यात


गतवर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या राजापूर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक ६ अ मधून निवडून आलेल्या कॉंग्रेसच्या नगरसेविका अफरोज महमंद झारी यांचे जात प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्यामुळे झारी यांचे नगरसेवक पद धोक्यात आले असून राजापूरच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. झारी यांच्याविरोधात महायुतीकडून निवडणूक लढविलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार निलोफर मुकादम यांनी याप्रकरणी जातपडताळणी समितीकडे तक्रार केली होती. परंतु, तक्रारदार निलोफर मुकादम यांनीही निवडणूक काळात जोडलेले जात जातप्रमाणपत्रही जिल्हा जातपडताळणी समितीने अवैध ठरविले आहे. त्यामुळे राजापुरात या एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार काय, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button