विनयभंगाचा आरोपी दापोली येथील बसस्थानक आवारात, कठोर कारवाईची मागणी


दापोली येथील एसटी आगारातील एका चालकावर विद्यार्थिनी महिलेच्या विनयभंगाचा आरोप असणारी व्यक्ती बस स्थानक आवारात दिसत असल्याने दापोलीत संतापाची लाट उसळली आहे. संबंधित चालकाविरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल असतानाही तो येथील एसटी आगारात कार्यरत असल्याचा आरोप करत सर्वपक्षीय नेत्यांनी आगारात धडक देत प्रभारी आगार व्यवस्थापकांना जाब विचारला. यावेळी संबंधित कर्मचार्‍यावर तातडीने कठोर प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच प्रवाशांच्या, विशेषतः महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अशा कर्मचार्‍याला सेवेत ठेवणे अयोग्य असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय शिष्टमंडळाने प्रभारी आगार व्यवस्थापकांना २४ तासांच्या आत संबंधित कर्मचार्‍यावर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button