मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

रत्नागिरी : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून
५ जून रोजी मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव येथे राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पर्यावरण संरक्षण, नैसर्गिक संसाधनांचे जतन आणि शाश्वत विकासाबाबत जनजागृती करण्यासाठी हा दिवस जगभरात पाळला जातो.
प्राचार्य डॉ. केतनकुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात महाविद्यालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिड टाउन, जिल्हा प्रकल्प समन्वयक, UNDP, रत्नागिरी, जलजीविका संस्था, रत्नागिरी आणि लोक कल्प फाऊंडेशन, रत्नागिरी यांनी वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेतला. आवळा, बेल, कडूलिंब, कोकम, शेवगा इत्यादी विविध प्रकारच्या झाडांची लागवड महाविद्यालयातील परिसरात करण्यात आली. सर्व रोपे इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी तर्फे प्रायोजित करण्यात आली होती.
पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि हरित परिसर निर्मितीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला तसेच परिसर हिरवागार व पर्यावरणपूरक करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. दुपारच्या सत्रात यु एन डी पी, रत्नागिरी आणि जलजीविका यांचे तर्फे पर्यावरण आधारित गेम्स घेण्यात आले. त्यात मत्स्य अभियांत्रिकीचे विद्यार्थी आणि क्रांती महिला बचत गट शिरगाव, रत्नागिरी येथील महिलांनी सहभाग घेतला.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मदत होणार असून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित आणि निरोगी पर्यावरण जपण्याचा संदेश समाजापर्यंत पोहोचणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button