बोरसुतची कन्या यामिनी खामकरची जागतिक मंचावर ढोलवादनाची चमक; संगमेश्वरच्या शिरपेचात मानाचा तुरा

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील बोरसुत येथील यामिनी खामकर हिने जागतिक व्यासपीठावर दमदार ढोलवादन सादर करत तालुक्याचे, कोकणाचे आणि महाराष्ट्राचे नाव उंचावले आहे. विविध देशांतील कलाकार आणि रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत तिने सहकलाकारांसह केलेल्या सादरीकरणाला उत्स्फूर्त दाद मिळाली.

यामिनीच्या या यशाबद्दल बोरसुत ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत तिची जिद्द, कठोर परिश्रम आणि ध्येयवेडेपणामुळेच तिने हे यश मिळविल्याचे सांगितले. तिच्या कामगिरीमुळे गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याला अभिमान वाटत असल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

यशाबद्दल भावना व्यक्त करताना यामिनी खामकर म्हणाली, “लहानपणापासूनच बोरसुत गावातील सण-उत्सव, पारंपरिक नृत्य आणि विशेषतः ढोलाचा आवाज माझ्या मनात रुजला. माझे वडील ढोलवादनाची आवड जपत असल्याने त्यांच्याकडून मला सातत्याने प्रेरणा आणि साथ मिळाली. कोकणातील होळी उत्सवातील पालखीसोबत घुमणारा पारंपरिक ढोलाचा नाद आज सातासमुद्रापार सादर करता आला, ही माझ्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.”

यामिनी खामकरच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button