उदयजी सामंत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइस युनियन’ मध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला.

शिवसेना मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री मा.ना.एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेना उपनेते आणि राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आज शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉइस युनियन’ मध्ये कामगारांनी मोठ्या संख्येने जाहीर प्रवेश केला.

या सोहळ्यात पक्षप्रवेश करणाऱ्यांचे मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी स्वागत केले. त्यांच्याशी संवाद साधतांना मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी विमानतळ कर्मचाऱ्यांच्या हक्कासह अधिकारांचे संरक्षण करण्याला पक्षाचे नेहमीच प्राधान्य राहिल. कामगारांवर येणाऱ्या संकटांवेळी शिवसेना कायम त्यांची ढाल बनून उभी राहिल, अशी ग्वाही दिली व संघटना अधिक बळकट करण्यासाठी संघटितपणे व सक्रियपणे कार्य करण्याचे आवाहनही केले.

या पक्ष प्रवेश सोहळ्याला आमदार श्री. मुरजी पटेल, आमदार श्री. मंगेश कुडाळकर, आमदार श्री. दिलीप लांडे, ‘ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन’ चे सचिव श्री.कुणाल सरमळकर हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button