
श्री देवी भगवती मंदिर किल्ला रत्नागिरी बळ उत्सव कार्यक्रम
रत्नागिरी– श्री देवी भगवती मंदिर किल्ला येथील बळ उत्सव कार्यक्रम दिनांक २९/०७/२०२६ वार बुधवार रोजी आहे.
श्री देवी भगवतीची बळ दुपारी १२:०० वाजता श्री देवी भगवती मंदिरातून निघून १ परडी हनुमान पारमार्गे, खन्नाकपंनी मार्गे हनुमान वाडी मार्गे,बोगद्यामार्गे, राम मंदिर मार्गे,मिर्याबदंर पंधरा माड येथे सिमेवर जाईल.
२ परडी भागेश्वर मंदिर मार्गे, बोगद्यामार्गे, राम मंदिर मार्गे, मांडवी समुद्र किनारा मार्गे , मांडवी नाका मार्गे, तेली आळी मार्गे,एस टी स्टँड मार्गे, जयस्तंभ मार्गे,के सी जैन मारूती मंदिर येथे सिमेवर जाईल.तेथे बळीची परडी ठेवून गार्हाणे घालून परत देवी भगवती मंदिर येथे येईल.




