संभाजीनगर येथील प्रती पंढरपूर येथे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते विठ्ठल-रुक्मिणीचा महाभिषेक


छत्रपती संभाजीनगर : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथील प्रती पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानमध्ये आयोजित महाभिषेक व विशेष पूजेचा मान राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा शिवसेना उपनेते उदय सामंत यांना लाभला.

मध्यरात्री बारा वाजता उदय सामंत यांनी विठ्ठल-रुक्मिणीची विधिवत पूजा-अर्चा करून महाभिषेक केला. यावेळी त्यांनी विठुरायाच्या चरणी महाराष्ट्रातील जनतेच्या सुख-समृद्धीसाठी, राज्यात शांतता नांदावी, शेतकरी समृद्ध व्हावेत तसेच कष्टकरी वर्गाच्या हाताला कायमस्वरूपी काम मिळावे, अशी प्रार्थना केली.

या धार्मिक सोहळ्याला खासदार संदीपान भुमरे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांच्यासह मंदिर संस्थानचे पदाधिकारी, मान्यवर आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या महाभिषेक सोहळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button