
चिपळुणात मुतखड्यावरील उपचारादरम्यान रूग्णालयात दाखल झालेल्या महिलेचा मृत्यू
मुतखड्याच्या उपचारादरम्यान एका ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून, याप्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. समृद्धी सुमेध कांबळे (वय ३५, रा. खंड बावशेवाडी) यांना मुत्नखड्याचा त्रास होत असल्याने ८ जुलै रोजी सायंकाळी चिपळूण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. ९ जुलै रोजी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर १० जुलै रोजी पहाटे त्यांचा रक्तदाब अचानक कमी होऊन प्रकृती खालावल्याने संबंधित डॉक्टरांनी त्यांना डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असतानाच १४ जुलै रोजी रात्री ८.११ वाजता त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.




