
राहुल-प्रियंका गांधींचे थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन; पंतप्रधान मोदी-शाहांच्या राजीनाम्याची मागणी
दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या पोलीस कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘७, लोककल्याण मार्ग’ निवासस्थानाबाहेर अचानक ठिय्या आंदोलन सुरू केल्याने राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.राहुल गांधी यांच्यासोबत वायनाडच्या खासदार प्रियंका गांधी वाड्रा आणि काँग्रेसचे प्रमुख नेतेही या आंदोलनात सहभागी झाले आहेत. दुपारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर पोहोचल्यानंतर काँग्रेस नेत्यांनी थेट रस्त्यावरच ठिय्या मांडला. या वेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली.




