
शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी येथील उपाहारगृहासाठी निविदा प्रसिद्ध; २१ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
रत्नागिरी, दि. ९ ) : शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी या संस्थेतील उपाहारगृह (कॅन्टीन) वर्ष २०२६-२७ करिता भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यात येणार असून, यासाठी इच्छुक कंत्राटदारांकडून मोहरबंद निविदा मागविण्यात येत आहेत, अशी माहिती तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. रा. ल. डोईफोडे यांनी दिली आहे.
इच्छुक कंत्राटदारांनी कोरे निविदा अर्ज संस्थेच्या विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडारातून दिनांक १० सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२६ या कालावधीत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत प्राप्त करून घ्यावेत. निविदा अर्जाची किंमत २०० रुपये (अक्षरी दोनशे रुपये फक्त) निश्चित करण्यात आली आहे.
पूर्ण भरलेले निविदा अर्ज आवश्यक कागदपत्रांसह मोहरबंद पाकिटात दिनांक २१ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत प्राचार्य, शासकीय तंत्रनिकेतन, रत्नागिरी यांच्या कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. प्राप्त झालेल्या निविदा दिनांक २२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता निविदाकार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींच्या (केवळ एक व्यक्ती) उपस्थितीत उघडण्यात येतील.
या निविदेबाबतच्या सविस्तर अटी व शर्ती संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच विद्यार्थी सहकारी ग्राहक भांडारात उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी सागर चंद्रकांत सुर्वे (मो. ९६७३११०९८०) किंवा चंद्रकांत रामचंद्र चौघुले (मो. ९३७३८९०२६०) यांच्याशी संपर्क साधावा.




