बाप्पाच्या आगमनाला वरुणराजा बरसणार


महाराष्ट्रातील कोकण, गोवा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळं बाप्पाच्या आगमनाला वरुणराजा बरसणार आहे.

11 सप्टेंबरमध्ये बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचा अंदाज आहे. याचा मोठा प्रभाव मध्य, पूर्व आणि दक्षिण भारतावर दिसून येईल. त्यामुळं कोकण आणि गोव्यात 8 ते 14 सप्टेंबर, विदर्भात 12 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 8 ते 14 सप्टेंबर दरम्यान वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाटा होण्याची शक्यता आहे. तर, उर्वरित राज्यात 12 ते 13 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस होऊ शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button