
देवरुख संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडी येथे मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू
देवरुख संगमेश्वर तालुक्यातील साखरपा सुर्वेवाडी येथे कौटुंबिक वावातून झालेल्या मारहाणीत जखमी झालेल्या वृद्धाचा सायन येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची पडली आहे. वसंत रामचंद्र माने ( ८४, रा. सुर्वेवाडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे. घटना देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार १० जुलै रोजी सुर्वेवाडी येथील राहत्या घरी वसंत माने आणि त्यांच्या पत्नी वर्षा माने वास्तव्याला होत्या. याचवेळी चुलत दिर राजेश आंत्माराम माने व त्यांच्या पत्नीने वसंत माने यांना शिवीगाळ करून मारहाण केली मारहाणीत वर्षा माने यांच्या डाव्या कानास दुखापत झाली. आत्माराम माने व रुतीक्षा यांनी वसंत माने यांना जोराचा धक्का दिल्याने ते जमिनीवर कोसळून जखमी झाले.
वसंत माने यांना उपचारासाठी तत्काळ साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर त्यांना कर्नाटक येथील डॉ. पांडुरंग कुंभार नेण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना १२ जुलै रोजी मुंबईतील सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.




