रानवी येथील बंद अवस्थेतील ’निरामय’ रूग्णालयाचे लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन


रानवी येथील बंद अवस्थेतील निरामय रुग्णालयाच्या उद्धारासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने बंद रुग्णालयाच्या पाहणीसाठी आलो आहे. हे रुग्णालय सुरू करण्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि आमदार प्रसाद लाड यांच्यावर सोपवली आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निरामय हॉस्पिटलचे उदघाटन होईल, असे शुभ संकेत आमदार प्रमोद जठार यांनी मंगळवारी येथे दिले.
आमदार जठार यांनी मंगळवारी गुहागर तालुक्यातील रानवी येथील बहुचर्चित बंद अवस्थेत असलेल्या निरामय रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, हे एक मोठं पाऊल उचलन जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार प्रसाद लाड यांनी सांगितल्याप्रमाणे आज आपण या निराम रुग्णालयाची पाहणी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button