
‘दुड दुड दौड स्पर्धा 2026’ चे आयोजन; 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील चिमुकल्यांसाठी सुवर्णसंधी
रत्नागिरी,
रत्नागिरीतील लहानग्यांच्या आयुष्यातील पहिली स्पर्धा संस्मरणीय ठरावी या उद्देशाने किरण डान्स अकॅडमी आयोजित ‘दुड दुड दौड स्पर्धा 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दिनांक 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता, मराठा भवन, माळ नाका, रत्नागिरी येथे होणार आहे.
या स्पर्धेत 6 महिने ते 2 वर्षे वयोगटातील चिमुकले सहभागी होऊ शकतील. स्पर्धेत गुडघ्यावर रांगण्याची स्पर्धा तसेच उभे राहून पायावर धावण्याची स्पर्धा असे दोन प्रकार असतील.
स्पर्धेची प्रवेश फी फक्त ₹500 असून प्रत्येक सहभागी बालकाला आकर्षक बक्षीस, सहभाग प्रमाणपत्र, सुंदर छायाचित्रांची आठवण तसेच हर्षोल्हासपूर्ण आणि मनोरंजक अनुभव दिला जाणार आहे.
गेल्या तीन वर्षांत या उपक्रमाला 500 हून अधिक बालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून यंदाही मोठ्या संख्येने पालकांनी आपल्या चिमुकल्यांचा सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली असून इच्छुक पालकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा.
संपर्क : 8208278397
– आयोजक : किरण डान्स अकॅडमी, रत्नागिरी




