भाड्याच्या जागेतील अंगणवाडी जि.प. शाळांमध्ये भरवा, जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे निर्देश


रत्नागिरी जिल्ह्यात भाड्याच्या इमारतींमध्ये सुरु असलेल्या अंगणवाड्या टप्प्याटप्प्याने जिल्हा परिषद शाळांमध्ये स्थलांतरित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विकासात्मक योजनांच्या आढावा बैठकीत घेण्यात आला. तसेच विविध विभागांनी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फतच शासनाकडे पाठवावेत आणि जिल्ह्याच्या गरजांशी संबंध नसलेले अनावश्यक प्रस्ताव सादर करू नयेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले.
बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, पालकमंत्र्यांचे खासगी सचिव योगेश महांगडे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, आ. किरण सामंत, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके, प्रांताधिकारी जीवन देसाई, विभागीय वन अधिकारी गिरिजा देसाई, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद) जिल्हा नियोजन अधिकारी निवास यादव, कार्यकारी अभियंता अमील ओटवणेकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button