अधिवेशनासाठी निघालेले आमदार शेखर निकम यांना वाहतूक ठप्प झाल्याचा फटका , जवळपास १६ ते १७ तासाचा मुंबई प्रवास


विधिमंडळ अधिवेशनाकरिता मुंबईला यायला सोमवारी निघालेल्या आमदारांनाही मुसळधार पावसाचा फटका बसला. अनेक आमदार अर्ध्या रस्त्यावरून माघारी परतले. तर काहिंची वाहतुकीत तासनतास कोंडी झाली.पुण्याच्या शिवाजीनगरचे भाजपचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना परिस्थितीचा अंदाज येताच पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरीरून परतण्याचा निर्णय घेतला. पण चिपळूण-संगमेश्वरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) शेखर निकम यांना दरड कोसळल्याने वाहतुकीचा खोळंबा होऊन जवळपास १६ ते १७ तास प्रवासात घालवावे लागले. हीच परिस्थिती मुंबईबाहेरील अनेक आमदारांवर ओढवली.

पावसाच्या जोरधारा सोमवारीही मुंबईसह रायगड, रत्नागिरीला झोपडणार, असा अंदाज असल्याने शाळांना आदल्या रात्रीच सुट्टी जाहीर करण्यात आली. मात्र विधिमंडळ अधिवेशनाबाबत अशी कोणतीच सूचना नसल्याने सोमवारी अधिवेशनाकरिता अनेक आमदारांनी पहाटेच आपापल्या गावाहून मुंबईकडे प्रवास सुरू केलाशेखर निकम पहाटे साडेपाचच्या सुमारास सावर्डेहून निघाले. सकाळीच माझ्या संस्थेचा एक विद्यार्थी मुंबईहून चिपळूणला आला. त्यामुळे मार्ग मोकळा असेल असे वाटले. एरवी साडेपाचला निघाल्यानंतर सकाळी साडेनऊपर्यंत मुंबईला पोहोचतो. परंतु, कशेडीला साडेसहाच्या सुमारास घाटात अडकलो. दरड कोसळल्याने येथील वाहतूक बंद होती. परंतु तेथून जी रखडपट्टी सुरू झाली ती सायंकाळी साडेपाचपर्यंत कायम होती. अखेर सायंकाळी रोह्यामार्गे अलिबागला यायचे ठरले आणि तेथून मुंबई गाठायचा निर्णय घेतला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button