चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट बारमाही धबधब्याला पर्यटनस्थळाचा दर्जा द्या : जि.प.सदस्या शिवानी सावंत


चिपळूण तालुक्यातील वीर-देवपाट येथील बारमाही धबधबा पर्यटनस्थळ म्हणून घोषित करण्यात यावा, अशी खास बाब म्हणून शिफारस करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्या नथा स्थायी समिती सदस्या शिवानी संदीप सावंत यांनी राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदयजी सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना यासंदर्भात आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्याने या मागणीला बळ मिळाले असून परिसराच्या पर्यटन विकासाच्या आशा उंचावल्या आहेत.
नैसर्गिक सौंदर्यामुळे हा परिसर कोकणातील पर्यटन नकाशावर विशेष आकर्षण ठरत असला, तरी शासनाकडून अधिकृत पर्यटनस्थळाचा दर्जा अद्याप मिळालेला नाही. जि.प. सदस्या शिवानी सावंत यांनी पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, पर्यटनस्थळ म्हणून घोषित झाल्यास येथे मूलभूत सुविधा उभारण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध होईल. पर्यटकांसाठी सुरक्षितता व्यवस्था, संरक्षक कठडे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहे, बीज, वाहनतळ, विश्रांती व्यवस्था, माहिती फलक, प्रवेशमार्गांचे सुशोभीकरण आदी सुविधा विकसित करता येतील. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या सभी उपलब्ध होतील आणि हा धबधबा केवळ निसगांचा अनमोल ठेवा नसून संपूर्ण परिसराच्या पर्यटन आणि आर्थिक विकासाचा महत्वाचा आधार ठरू शकतो.
या धबधब्याला पर्यटनस्थळाचा दर्जा मिळाल्यास स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. महिला बचत गट, होमस्टे, हॉटेल व्यवसाय, स्थानिक व्यावसायिक तसेच पर्यटनाशी संबंधित विविध व्यवसायांनाही मोठी चालना मिळेल. या निवेदनाची दखल घेत पालकमंत्री उदयजी सामंत यांनी जिल्हाधिकारी रत्नागिरी यांना आवश्यक प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button