
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा रस्त्यावर वाहतुकीस अडथळा चालकावर गुन्हा
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा ते सैतवडे सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन उभे करणार्या वाहनचालकावर जयगड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. सोमवारी सायंकाळी ६.३० वाजता पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. अब्रार शकिल अहमद (३४, रा. वाटद-खंडाळा रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. अब्रार याने आपली मोटारसायकल (एमएच ०८ के ४५१९) ही वाटद खंडाळा ते सैतवडे रस्त्यावर वाहतुकीस अडथळा होईल अशा पद्धतीने उभी केली होती अशी तक्रार दाखल करण्यात आली आहे.




