
पर्यटकांच्या संख्येत वाढ, मात्र पर्यटन हंगामात महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले
पाली महामार्ग वाहतूक पोलीस विभागाच्या अखत्यारित कशेडी चिपळूण, हातखंबा अशी तीन महामार्ग पोलीस मदत केंद्रे आहेत. त्यांच्या अखत्यारित मुंबई गोवा महामार्गाचे पोलादपूर (जि. रायगड) ते मारवंडे ७५ कि.मी., मोरवंडे ते बावनदी ९८ कि.मी., बावनदी ते खारेपाटण (सिंधुदुर्ग) ९० कि. मी. अशी तर गुहागर विजापूर महामार्गाचे चिपळूण ते मंडणगड ७५ कि.मी., चिपळूण ते कराड नागपूर ५०कि.मी. तर मिर्या महामार्गाचे मिरागाव ते आंबागाव (जि. कोल्हापूर) ७३ कि.मी. असे प्रमुख राष्ट्रीय महामार्ग येतात तर खेड ते पोलादपूर ५० कि. मी, संगमेश्वर ते साखरपा ३० कि. मी., वहाळ ते आबलोली ६० कि. मी. ओणी ते पाचल ४० कि.मी. असे राज्य मार्ग येतात.
कशेडी, चिपळूण, हातखंबा या तीन पोलीस मदत केंद्राच्या अखत्यारित राष्ट्रीय व राज्य महामार्गावर यावर्षी १ जानेवारी ते ३१ मे या कालावधीमध्ये ७८ अपघात झाले त्यात ३७ प्राणांतिक अपघातात २८ मृत झाले तर ५३ जखमी झाले तर गंभीर जखमी ६६ अपघातामध्ये १४, किरकोळ जखमी ३५ अपघातात ३४ जखमी, विना दुखापत ३६ अपघात झाले आहेत.
म्हणजे तुलनात्मकरीत्या मागील काही वर्षांत अपघातात वाढ होत असून सरासरी मयत होण्याचे प्रमाण मात्र वाढले आहे. तर गंभीर जखमी, किरकोळ जखमींचे प्रमाण वाढले आहे रत्नागिरी विभाग महामार्ग वाहतूक पोलीस १०० निरीक्षक दीपाली जाधव यांनी सांगितले की, ब्लॅक स्पॉटवर विशेष लक्ष देऊन त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी पाठपुरावा करुन उपाययोजना केल्या जातात तसेच चौपदरीकरणातील अपूर्ण कामांच्या ठिकाणी पर्यायी वळण रस्ते काढून तिथे फलक लावले, रिफ्लेक्शन बोर्ड लावणे उपाययोजना करुन अपारति रोखण्याचा प्रयत्न केला जात आहे.




