गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने जिंकला सायकलिंग एव्हरेस्ट


गणपतीपुळे येथील २० वर्षीय अथर्व शेंड्ये याने रत्नागिरी जिल्ह्यासाठी एक ऐतिहासिक कामगिरी करीत सायकल एव्हरेस्टिंग यशस्वीरित्या पूर्ण केलं, रत्नागिरीजवळील टेंबेपूल ते चाळकेवाडी जलशुद्धीकरण केंद्र हा चढाव त्याने तब्बल ७० वेळा पार करीत ४१ तासांत सलग ५०० किलोमीटरहून अधिक सायकलिंग आणि १०,००० मीटरपेक्षा जास्त उंचीची चढाई पूर्ण केली.
समुद्रसपाटीपासून एव्हरेस्ट शिखराची उंची ८,८४८ मीटर आहे. सायकलस्वाराने एका निश्चित टेकडीवर सतत चढ-उतार करत किमान ८,८४८ मीटर उंची गाठणे, याला सायकल एव्हरेस्टिंग असे म्हटले जाते. जगभरातील सायकलपटूंमध्ये हा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि आव्हानात्मक उपक्रम मानला जातो. रत्नागिरी परिसरात एव्होस्टिंगच्या कठोर नियमांमध्ये बसणारा चढ उपलब्ध नसल्यामुळे स्थानिक सायकलप्रेमींना यासाठी मुंबई, पुणे किंवा इतर शहरांमध्ये जावे लागत होते. गेली दोन वर्षे अथर्व अशा योग्य चढाच्या शोधात होता. एव्हरेस्टिंगचे नियम अत्यंत कठोर असल्याने अनेक चढाव पात्र ठरत नव्हते. अखेर अथक प्रयत्नांनंतर त्याने टेंब्ये चाळकेवाडी हा मार्ग शोधून काढला आणि त्याला एव्होस्टिंगसाठी मान्यता मिळवून दिली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button