
‘मनसे’ चा रत्नागिरी जिल्हा विधानसभा निहाय आढावा बैठक व संपर्क दौरा २८ जूनपासून सुरू
रत्नागिरी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार नितीन सरदेसाई आणि शिरीष सावंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना रत्नागिरी जिल्हा विधान सभानिहाय २८ जूनपासून आढावा बैठक व संपर्क दौरा आयोजित केला आहे.
२८ जून रोजी सकाळी १० वाजता राजापूर शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात बैठक होईल. दुपारी १२ वाजता देवरुख, (ता. संगमेश्वर), तर सायंकाळी ४.३० वाजता
रत्नागिरी शासकीय विश्राम गृह येथे बैठक होईल.
सोमवारी (२९ जून) सकाळी १० वाजता राजगड, शृंगारतळी (ता. गुहागर), ११.३० वाजता शासकीय विश्रामगृह चिपळूण, तर दुपारी ३.३० वाजता दापोली येथे बैठक होईल.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व अंगीकृत संघटनांचे आजी व माजी महिला, पुरुष पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी बैठकांना उपस्थित रहावे, असे आवाहन अविनाश सौंदळकर यांनी केले आहे.




