रत्नागिरी जिल्हयातील एसटीची पार्सल सेवा अचानक ठप्प


राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) पार्सल वाहतूक सेवेशी संबंधित कंत्राटदाराचा परवाना अचानक रद्द करण्यात आल्याने राज्यभर एसटी पार्सल सेवा ठप्प झाली असून त्याचे पडसाद रत्नागिरी जिल्ह्यातही उमटले आहेत.
जिल्ह्यातील सर्व एसटी स्थानकांवर पार्सल बुकिंग व वितरणाच्या कामावर परिणाम झाला आहे. त्यामुळे व्यापारी, उद्योजक लघुउद्योजक आणि सर्वसामान्य ग्राहक अडचणीत सापडले आहेत. एसटीच्या पार्सल सेवेद्वारे जिल्ह्यातून मुंबई, पुणे आणि राज्यातील अन्य शहरांकडे कागदपत्रे, औद्योगिक साहित्य, औषधे, किरकोळ माल आणि व्यावसायिक पार्सलची मोठ्या प्रमाणावर वाहतूक केली जाते. अचानक सेवा बंद झाल्याने अनेक पार्सल विविध डेपोमध्ये अडकून पडली असून व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक व्यापार्‍यार्‍यांनी एसटी पार्सल सेवा ही जलद किफायतशीर विश्वासार्ह असल्याथ मिलाते सेवा बंद झाल्यामुळे पर्वाधी वाहतुकीचा खर्च वाढला असून लहान व्यापार्‍यार्‍यांना आर्थिक फटका बसला आहे. विशेषतः औषध तातडीची कागदपत्रे आणि लहान व्यावसायिक माल वेळेत पोहोचत नसल्याने व्यवहारांवर परिणाम होत आहेwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button