
नाशिकहून मुंबईला स्पेशल विमानाने आणलं, पण मुंबईला येताच कोलांट उडी; गोकुळ गितेंचा गेम?
नाशिक विधान परिषद निवडणूक जिंकताच अपक्ष उमेदवार गोकुळ गीतेंचं राजकीय वजन वाढलंय. कालपर्यंत ज्या गोकुळ गीतेंनी निवडणुकीतून माघार घ्यावी यासाठी मंत्री उदय सामंत प्रयत्न करीत होते त्याच सामंतांनी आज गीतेंना मुंबईला स्पेशल खासगी विमानाने घेऊन आले.गोकुळ गीतेंच्या अंगावरचा विजयाचा गुलाल पुसण्याआधीच त्यांना शिवसेननं गळाला लावण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा होची. मात्र मुंबईत येताच काही भलतंच घडल्याचं चित्र पाहायला मिळालं आहे. मुंबईला आलेल्या गोकुळ गितेला शिंदेसेनेने वेटिंगवर ठेवल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
गोकुळ गितेंच्या अंगावर विजयाचा गुलाल पडताच शिंदेंनी विशेष विमान पाठवले होते.
विशेष म्हणजे या विमानात उदय सामंत, आमदार किशोर पाटील, माजी खासदार उन्मेष पाटीलही त्यांच्या सोबतीला होते. खरं तर या निवडणुकीत बरचं राजकारण रंगलं होतं. गोकुळ गीतेंनी अपक्ष म्हणून ही निवडणूक लढवली होती. त्यांनी या निवडणुकीतून माघार घ्यावी म्हणून उदय सामंत आणि गिरीश महाजनांनी आठवडाभर प्रयत्न केला होता. त्यानंतर गीतेंनी थांबण्याचा निर्णय घेतला होता पण त्यांनी उमेदवारी कायम ठेवली होती. या निवडणुकीत गोकुळ गीतेंनी शिवसेनेचे नरेंद्र दराडेंना पराभूत केलंय. गोकुळ गीत शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंयदरम्यान नाशिकहून स्पेशल विमानाने मुंबईला आलेल्या गोकुळ गितेंचा पक्षप्रवेश शिंदेंनी वेटिंगवर ठेवल्याच्या चर्चा आहेत. आयत्या वेळेला शिवसेनेत होणारा गोकुळ गितेंचा पक्ष प्रवेश पुढे ढकलून थांबवण्यात आला आहे




