
मतदार यादी विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम २०२६ ; ‘या’ महत्त्वाच्या तारखा आणि नियमांची घ्या नोंद!
*भारत निवडणूक आयोगाने राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) कार्यक्रम २०२६ घोषित केला आहे. या महत्त्वपूर्ण मोहिमेची प्रत्यक्ष सुरुवात ३० जून २०२६ पासून होत असून, याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
*मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे महत्त्वाचे टप्पे*
या विशेष मोहिमेत पारदर्शकता आणि अचूकतेसाठी खालीलप्रमाणे टप्पे निश्चित करण्यात आले आहेत:
कार्यक्रम / टप्पाकालावधी / तारीख
अर्हता दिनांक (Eligibility Date)१ ऑक्टोबर २०२६
तयारी, प्रशिक्षण व छपाई कालावधी २० जून २०२६ ते २९ जून २०२६
BLO मार्फत घरोघरी भेटीचा कालावधी ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६
मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण २९ जुलै २०२६
प्रारूप मतदार याद्यांची प्रसिद्धी ५ ऑगस्ट २०२६
दावे व हरकती दाखल करण्याचा कालावधी ५ ऑगस्ट २०२६ ते ४ सप्टेंबर २०२६
दावे व हरकती निकालात काढण्याचा कालावधी ५ ऑगस्ट २०२६ ते ३ ऑक्टोबर २०२६
अंतिम मतदार यादीची प्रसिद्धी ७ ऑक्टोबर २०२६
मतदारांनी काय करणे आवश्यक
नाव तपासणी: मतदारांनी मागील विशेष संक्षिप्त पुनरिक्षणामधील मतदार यादीत स्वतःचे आणि आपल्या नातेवाईकांचे नाव voters.eci.gov.in या संकेतस्थळावर तपासून घ्यावे व घोषणापत्रात तपशील भरावा.
BLO ची मदत: कोणत्याही मदतीसाठी मतदार आपल्या संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी (BLO) संपर्क साधू शकतात.
तपशील न जुळल्यास नोटीस: मतदार यादीतील तपशील उपलब्ध नसल्यास किंवा डेटाबेसशी जुळत नसल्यास, मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडून संबंधित मतदारास नोटीस पाठवण्यात येईल.
नोटीस मिळाल्यास सादर करावयाची कागदपत्रे
नोटीस प्राप्त झाल्यानंतर मतदारांनी स्वतःची जन्मतारीख व जन्मस्थळ सिद्ध करण्यासाठी (तसेच आवश्यकतेनुसार माता-पित्यांचे) खालीलपैकी कोणतेही एक स्व-प्रमाणित कागदपत्र सादर करणे आवश्यक आहे:
महत्त्वाची अट: १ जुलै १९८७ पूर्वी, १ जुलै १९८७ ते २ डिसेंबर २००४ दरम्यान आणि २ डिसेंबर २००४ नंतर भारतात जन्म झालेल्या नागरिकांसाठी, तसेच भारताबाहेर जन्म झालेल्या किंवा नागरिकीकरण प्राप्त केलेल्या व्यक्तींसाठी नियमांनुसार स्वतःचे किंवा पालकांचे वैध पुरावे सादर करावे लागतील.
कागदपत्रांची सूचक यादी:
केंद्र/राज्य शासन किंवा सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU) यांचे ओळखपत्र किंवा निवृत्तीवेतन आदेश (PPO).
शासन/बँका/टपाल विभाग/LIC/PSU मार्फत भारतात निर्गमित केलेले १ जुलै १९८७ पूर्वीचे ओळखपत्र/प्रमाणपत्र.
सक्षम प्राधिकरणाने दिलेले जन्म प्रमाणपत्र.
पासपोर्ट (पारपत्र).
मान्यताप्राप्त मंडळ/विद्यापीठाचे मॅट्रिक्युलेशन/शैक्षणिक प्रमाणपत्र.
सक्षम राज्य प्राधिकरणाचे कायमस्वरूपी रहिवासी प्रमाणपत्र.
वनहक्क प्रमाणपत्र.
सक्षम प्राधिकरणाचे जात प्रमाणपत्र (OBC/SC/ST).
राष्ट्रीय नागरिक नोंदवही (NRC) – जेथे लागू असेल तेथे.
शासकीय अधिकाऱ्यांमार्फत जतन केलेली कौटुंबिक नोंदवही.
शासनाने दिलेले जमीन/घर वाटप प्रमाणपत्र.
आधार पडताळणीकरिता, निवडणूक आयोगाच्या पत्र क्र. 23/2025-ERS/Vol. II दि. 09.09.2025 मधील मार्गदर्शक निर्देश लागू राहतील.
मतदार नोंदणी अधिकाऱ्यांची माहिती
१) २६३ – दापोली विधानसभा मतदारसंघ:
नाव: डॉ. विजयकुमार सूर्यवंशी
पदनाम: उपविभागीय अधिकारी, दापोली
कार्यालयीन पत्ता: उपविभागीय अधिकारी कार्यालय, दापोली
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक: 02358-282031 / 8806692383
२) २६४ – गुहागर विधानसभा मतदारसंघ:
नाव: वैशाली पाटील
पदनाम: उपविभागीय अधिकारी, खेड
कार्यालयीन पत्ता: उपविभागीय अधिकारी कार्यालय, खेड
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक: 02352-264848 / 9011234299
३) २६५ – चिपळूण विधानसभा मतदारसंघ:
नाव: आकाश लिगाडे
पदनाम: उपविभागीय अधिकारी, चिपळूण
कार्यालयीन पत्ता: उपविभागीय अधिकारी कार्यालय, चिपळूण
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक: 02355-255046 / 9730444540
४) २६६ – रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ:
नाव: जीवन देसाई
पदनाम: उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी
कार्यालयीन पत्ता: उपविभागीय अधिकारी कार्यालय, रत्नागिरी
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक: 02352-222422 / 7423999999
५) २६७ – राजापूर विधानसभा मतदारसंघ:
नाव: विश्वजीत गाताडे
पदनाम: उपविभागीय अधिकारी, राजापूर
कार्यालयीन पत्ता: उपविभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर
कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक: 02353-232519 / 7776817916
लोकशाहीच्या या सर्वात मोठ्या प्रक्रियेत आपले नाव मतदार यादीत अचूक नोंदवले जावे, यासाठी सर्व नागरिकांनी व मतदारांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
– प्रशांत कुसुम आनंदराव सातपुते
जिल्हा माहिती अधिकारी, रत्नागिरी




