
अंमली पदार्थाचे सेवन करणार्यावर गुन्हा
रत्नागिरी शहरातील थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करणार्या संशयितावर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली. अदनान शफिक फणसोपकर (३०, रा. कर्ला, रत्नागिरी) असे यातील संशयिताचे नाव आहे. यातील अदनान हा थिबा पॅलेस रोड येथे अमली पदार्थाचे सेवन करताना पोलिसांना आढळून आला. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी अमली पदार्थ पदार्थ सेवन करण्याचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत अधिक तपास रत्नागिरी पोलिस करीत आहेत.
www.konkantoday.com




