
जि.प.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी येथे योगदिन संपन्न

जि.प.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी ता.जि.रत्नागिरी येथे जागतिक योग दिन संपन्न झाला.

सुरुवातीस योगाभ्यास ही काळाची गरज आहे.ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे.याबाबत मुख्याध्यापक श्रीम.अनुजा केळकर यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर ‘मज नको औषधे योग हवा’ हे योगगीत विद्यार्थ्यांनी सादर केले.

त्यानंतर शाळेच्या शेजारील हेमंत आठवले नियोजित नारळाच्या बागेत योग सराव करण्यात आला.ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी आठवले कुटुंबिय आणि पालक वर्ग उपस्थित होता.योग प्रात्यक्षिकानंतर प्रसाद आठवले कुटुंबियांनी मुलांना खाऊवाटप केले.
या अनोख्या कार्यक्रमात शिक्षक विद्यार्थ्यांनी सुंदर योगासने प्रात्यक्षिके, प्राणायाम करुन दाखवले.उपस्थित सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.




