
बावनदी येथे कोळसा वाहतूक करणारा डंपर पलटी; सुदैवाने चालक बचावला
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी येथे अवघड वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रक पलटी झाला. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखत ट्रकमधून बाहेर उडी घेतल्याने त्याचा जीव वाचला. ही घटना काल (२० जून) रात्रीच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरीहून संगमेश्वरच्या दिशेने कोळसा घेऊन जाणारा ट्रक बावनदी परिसरात आला असता हा अपघात घडला. महामार्गावरील वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यावर पलटी झाला.अपघातानंतर ट्रकमधील कोळसा आणि राख मोठ्या प्रमाणात रस्त्यावर विखुरली. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.




